ऑल इज वेल

(सद्गुण, सदविवेक आणी सदाचाराच्या दिशेने युवक- युवतींची वाटचाल होण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा )

युवा अवस्था म्हणजे आयुष्यातील सर्वात आनंदाचे उत्साहाचे पर्व. नवनव्या आवाहनांना धाडसाने सामोरे जाण्याचे पर्व , या वयात होणारे शरीरात व मनात घडत जाणारे बदल, युवक युवतींचे परस्परांबद्दल वाढत जाणारे आकर्षण, क्रश, बाॅयफ्रेन्ड - गर्ल फ्रेन्ड असण्याची इच्छा, सुंदर दिसण्यासाठी चाललेले पार्लर व अन्य अनेक प्रयत्न, उफाळून येत असलेली बंडखोर वृत्ती, सेक्स, लैंगिक छळ, पोर्नोग्राफी हा आधुनिक आजार, शिक्षण प्रक्रियेकडे पहाण्याचा बदलत जाणारा व खालावत जाणारा दृष्टिकोन, व्यक्तीमत्वाचा होत जाणारा अर्धवट वा काहिसा चुकिचा विकास , बाजाराचे व बाजारातील हजारो वस्तू खरेदी करण्याचे आकर्षण ; हे आणि असे अनेक मुद्दे या वयातील तरुणाई वर प्रभाव टाकत असतात.

या सोबतच कंटाळा, निराशा, काळजी, भिंती, दडपण, दुर्लक्ष, राग, एकटेपणा, बेदरकार वृत्ती, स्वार्थ इत्यादी एक वा अनेक सवयी आणि दुर्गुण देखील डोकं वर काढण्याची शक्यता असते

प्रत्येकाच्या व्यक्तीत्वात दडलेली सहजता, चांगुलपण, निरागसता, मनाचे मोठेपण, खिलाडूवृत्ती, परोपकार, आनंदी आणि उल्हासित दृष्टिकोन, स्वतः वरील विश्वास, सामाजिक जाणीवा, चुक- बरोबर ठरविता येण्याचा दृष्टिकोन, ठामपणे निर्णय घेण्याची क्षमता इत्यादी चांगल्या क्षमतेने समोर आणण्याचे प्रयत्न आहेत.

आईवडील, मित्र, सेक्स, शिक्षण प्रक्रिया, स्वतः च्या पायावर उभे राहण्याचा प्रवास आदी बाबत सजग व चांगला दृष्टिकोन बाणविण्याचा प्रयत्न आहे.

अर्थातच भाषण आणि मार्गदर्शनाऐवजी सृजनाला साद घालणारे कल्पक खेळ, खूप आनंद देणारी समुह गाणी, टाळ्या, घोषणा, गटचर्चा आदी माध्यमांचा प्रभावी उपयोग या कार्यशाळेमधून केला जाणार आहे.

अशा प्रकारच्या ८०० पेक्षा अधिक कार्यशाळा यशस्वीपणे संचलनाचा अनुभव असलेले ख्यातनाम प्रशिक्षक ही कार्यशाळा संचालित करणार आहेत.

साधना साप्ताहिक, पुणे चे व्यवस्थापक वर राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष

राजेंद्र बहाळकर

गणेश मंदिर, इंदिरानगर 8/1/2025 सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत

Paris